
नोकरी शोधण्यासाठी आणि करीअर प्लॅनिंग करण्यासाठी गुगलने एक नवीन एआय टूल लाँच केले आहे. या टूलचे नाव करीअर ड्रिमर असे आहे. सध्या हे एक्सपेरिमेंट टप्प्यात असून लवकरच याचा विस्तार केला जाणार आहे. या टूलमुळे उमेदवाराला शैक्षणिक पार्श्वभूमी, स्किल्स, इंटरेस्ट आणि अनुभवाचा पॅटर्न शोधण्यास मदत करेल. हे सर्व पॉइंट्स जोडून एक प्रोफेशनल स्टोरी तयारी करू शकतो. त्यामुळे उमेदवाराला एक चांगली नोकरी मिळण्यास नक्कीच मदत मिळू शकते.