
अॅपलने आपल्या अॅप स्टोअरवर स्वच्छता मोहीम राबवली असून याअंतर्गत अॅप स्टोअरवरून 1.35 लाख अॅप्सला हटवले आहे. पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अॅपलने ही कारवाई केली आहे. हे अॅप्स ट्रेडर्सची माहिती देण्यास अयशस्वी ठरले होते. त्यामुळे पंपनीने ही कारवाई केली आहे. अॅपलने या अॅप डेव्हलपर्सला ट्रेडरची माहिती देण्यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाइन दिली होती. जर माहिती दिली नाही तर अॅप बंद केले जाईल, असे अॅपलने म्हटले होते. पंपनीने दोन दिवसांत युरोपीय देशांतील 1.35 लाख अॅप्स हटवले आहेत.