ढिसाळ नियोजनाचा प्रकाशकांना फटका

>> विदुला झगडे

देशाच्या राजधानी दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी’त 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा फटका प्रकाशकांना बसल्याचे काहीसे चित्र आहे. पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भ यांसह परराज्यांतील प्रकाशकांनी स्टॉल्स उभारले आहेत. वाचनप्रेमींची प्रतीक्षा प्रकाशकांना आहे.

विविध प्रकाशन संस्थांचे सुमारे 84 स्टॉल्स उभारण्यात आले असून या विभागाला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्र्ााr जोशी ग्रंथनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यातील ग्रंथाली, अनुबंध, साहित्य चपराक, संस्कृती, शुभम, शब्दालय, स्वरूप प्रकाशन, बालभारती तसेच मुंबईतील पॉप्युलर प्रकाशन, मुंबई साहित्य मंडळ आदींसह धुळे येथील इतिहासचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषद, तेलंगणा राज्य प्रकाशन मंडळासह राज्यभरातून आलेल्या प्रकाशकांचे स्टॉल्स आहेत. परंतु संमेलनाच्या पहिल्याच दिवशी आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका स्टॉल्सना बसल्याची खंत काही प्रकाशकांनी व्यक्त केली.

यवतमाळमधील पुसद येथील ‘विद्याधन प्रकाशन’ने भारत व महाराष्ट्रासह जिह्यांच्या चक्रीय नकाशांचा स्टॉल लावला होता; परंतु त्याला वाचकांचा पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. याशिवाय ज्या प्रकाशकांचे स्टॉल्स आतील बाजूस आहेत, तिकडे लोकच येत नसल्याचेही प्रकाशक म्हणाले.

सरकारला संमेलनाध्यक्षांचा विसर

साहित्य संमेलनाची जाहिरात सरकारच्या वतीने वृत्तपत्रांत देण्यात आली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे फोटो आहेत. मात्र, संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर तसेच साहित्य महामंडळाचा मात्र सरकारला विसर पडला. त्यावरून सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटल्या. ‘‘जाहिरात बनवणाऱयांना ताराबाई भवाळकर कोण हे माहीत असण्याची शक्यता कमीच आहे,’’ असा टोला एका नेटकऱयाने लगावला.

n मुंबई पत्रकार संघानेदेखील आपला स्टॉल लावलेला आहे. यामध्ये फक्त पत्रकार संघातील सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. यामध्ये 1950 सालापासूनच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे.