कलेच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती

मर्क इंडियाच्या पुढाकाराने देशातील रुग्णालयांना प्रेरणादायी चित्रांचे वाटप करण्यात आले. कर्करोगाविरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी मर्प इंडियाच्या टीमने आर्ट अगेन्स्ट कॅन्सर ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत केम्स का@र्नर येथील एमओसी पॅन्स केअर अँड रिसर्च सेंटरला ट्रायम्फ ओव्हर पॅन्सर नावाची एक अद्भुत कलापृती भेट देण्यात आली. ही कलापृती एमओसीचे संचालक आणि सल्लागार मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वशिष्ठ मणियार आणि एमओसीचे वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कुणाल जोबनपुत्र यांनी स्वीकारली.