चीनमध्ये सापडला नवा व्हायरस

कोरोना व्हायरसला हरवून संपूर्ण जग पूर्वपदावर येत असताना आता चीनमध्ये एचकेयु 5 नावाचा आणखी एक नवा व्हायरस सापडल्याचे वृत्त आहे. हा व्हायरस कोव्हीड-19 सारखाच असल्याचे सांगितले जात आहे. वटवाघळाद्वारे त्याचा प्रसार होतो. याबाबतचे संशोधन चीनमधील वैज्ञानिक शी झेंगली यानी केले आहे. या बातमीमुळे जगाला पुन्हा धडकी भरली आहे.  शि झेंगली हे वुहान इन्स्टिटयूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात.