गडकरींच्या खात्याने बांधलेला पूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचला, चालत्या कारवर काही भाग कोसळला

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचला. पारडी परिसरातील या उड्डाणपुलाचा प्लास्टर आणि सुमारे 60 किलो वजनाचा सिमेंट काँक्रीटचा तुकडा आज चालत्या कारवर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. हा उड्डाणपूल गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूर्व नागपूरचे आमदार पृष्णा खोपडे यांनी उड्डाणपुलाचे लोकार्पण केले होते. अचानक पुलाचा भाग कोसळल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.