बीबीसी इंडियाला ‘ईडी’ने ठोठावला 3.44 कोटींचा दंड

ईडीने बीबीसी इंडियाला 3.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. थेट परकीय गुंतवणूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच ईडीने त्यांच्या तीन संचालकांना प्रत्येकी 1.14 कोटींपेक्षा अधिक दंड ठोठावला आहे. हा आदेश परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्या अंतर्गत (एफईएमए) जारी करण्यात आला. 2019मध्ये सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, डिजिटल मीडियामध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्के निश्चित करण्यात आली होती. मात्र बीबीसी इंडियाने याचे पालन केले नाही. यापूर्वी 4 ऑगस्ट 2023 रोजी ईडीने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इंडियाचे तीन संचालक आणि मुख्य आर्थिक सल्लागार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.