
हिंदुजा रुग्णालय आणि टाटा रुग्णालयाच्या वतीने गेली तीन दशके अविरतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या गिरनार चषक आंतररुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजक असलेल्या डॉ. एस. एच. जाफरी यांचा आत्माराम मोरे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. क्रिकेट संघटक व कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीला सदैव तत्पर असलेल्या डॉ. जाफरी यांनी गिरनार स्पर्धेत पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद केली होती. निवृत्तीनंतर ते टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. वर्ल्ड कप-2011 चे मीडिया मॅनेजर व वर्ल्ड कप 2023चे ऑपरेशनल मॅनेजर ते होते. तसेच डॉ. जाफरी दक्षिण आफ्रिका एकदिवसीय व टी-20 क्रिकेट दौऱ्यावरील हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे व्यवस्थापकसुद्धा होते. क्रिकेट खेळाबरोबर सामाजिक व आरोग्य क्षेत्रातदेखील त्यांचे भरीव योगदान आहे. म्हणूनच त्यांचा आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धेनिमित्त आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीपुमार मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.