
ऍपल कंपनीने आपला स्वस्त आयफोन 16 ई लाँच केल्यानंतर जुन्या तीन आयफोनची विक्री बंद केली. आयफोन एसई, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे तीन मॉडेल आता हिंदुस्थानात विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत. या तिन्ही मॉडल्सला कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून हटवले आहे. परंतु ऍपलचे हे सर्व मॉडल्स फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन इंडिया या रिटेलर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. या तिन्ही मॉडलला कंपनीने 2022 मध्ये लाँच केले होते. आयफोन एसईची किंमत 43,900 रुपयांपासून सुरू होते. आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस फोनची किंमत अनुक्रमे 79,900 रुपये व 89,900 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करण्यात आले होते. आयफोन 16 सीरिजच्या लाँचिंगनंतर आयफोन 15 प्रो सीरिज आणि आयफोन 13 मॉडल्सची विक्री बंद केली होती.