
हिंदुस्थानात कोट्यवधी लोक हे मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी गुगल पे वापरतात, परंतु आता या सुविधेसाठी गुगल पैसे आकारणार आहे. गुगल पेने डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे गॅस सिलिंडर बुकिंग, वीज बिल पेमेंट, डीटीएच रिचार्ज, फास्टॅग रिचार्ज पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणाऱ्या वापरकर्त्यांकडून ‘प्रक्रिया शुल्क’ किंवा प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. फोन पे आणि पेटीएमदेखील बिल पेमेंट, रिचार्ज आणि इतर सेवांसाठी समान शुल्क आकारतात. याआधी ही सुविधा फ्री होती. ग्राहकांना यापुढे गुगल पेच्या शुल्क व्यवहारांवरील रकमेच्या 0.5 टक्के ते 1 टक्के पैसे मोजावे लागतील. या प्रोसेसिंग शुल्कावर उत्पादन शुल्क आणि सेवा कर (जीएसटी) देखील आकारला जात आहे. याआधी 2023 मध्ये गुगल पेने मोबाईल रिचार्जवर सेवा शुल्क आकारण्याची घोषणा केली होती.