Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री

रणजी ट्रॉफी 2024-25 आता अंतिम टप्प्यात आली आहे. विदर्भ आणि मुंबई यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विदर्भने दमदार कामगिरी केली असून मुंबईचा 80 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे केरळने गुजरातवर दोन धावांची आघाडी घेत पहिल्यांदाज रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

केरळने प्रथम फलंदाजी करताना 457 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरात गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  केरळच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत गुजरातच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले आणि गुजरातचा संपूर्ण संघ 455 वर बाद झाला. हीच दोन धावांची आघाडी केरळला फायनलमध्ये पोहचण्यासाठी महत्त्वाची ठरली. अनिर्णीत सुटणाऱ्या या सामन्यात दिवसाच्या सुरुवातीला केरळच्या संघाला तीन विकेट आणि 28 धावा वाचवायच्या होत्या. गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे धावा वाचवण्यात संघ यशस्वी ठरला. केरळने दुसऱ्या डावात 46 षटकांमध्ये 4 विकेट गमावत 114 धावा केल्या.

Ranji Trophy – विदर्भनं वचपा काढला, मुंबईचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक