
होळी-शिमगा हा कोकणातील मोठा सण म्हणून ओळखला जातो. याचनिमित्त कोकणात जाण्याचा विचार करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवषी शिमग्यानिमित्त कोकणात जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असते. याचमुळे आता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहे. यासाठी 24 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ….
मध्य, कोकण रेल्वे मार्गावरून सोडल्या जाणार ‘या’ विशेष रेल्वेगाड्या
गाडी क्रमांक 01151 सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून 6 मार्च, 13 मार्च रोजी मध्यरात्री 12.30 वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी 7, 14 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता मडगाव येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01152 मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून 6 मार्च आणि 13 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री 3.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
याशिवाय गाडी क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव 13 मार्च, 20 मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10.15 वाजता सुटेल. ही रेल्वे 14 मार्च आणि 21 मार्च रोजी दुपारी 12.45 वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01130 मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी 14 मार्च, 21 मार्च रोजी मडगाव येथून दुपारी 1.40 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी 22 मार्च रोजी पहाटे 4.04 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.