
मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासांत रद्द करण्यात आली. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? असा सवाल काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय या दोघांना आज गुरुवारी नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा व पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावरच भाष्य करताना वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
X वर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, ”सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी 24 तासांत आमदारकी रद्द केली. आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे?” ते म्हणाले, ”धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, ”त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय आहे?”
मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली.
सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली.
आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 21, 2025