10th Paper Leak: कॉपीमुक्त परीक्षा करू सांगणाऱ्या सरकारचा फज्जा उडाला, दहावीच्या पेपरफुटीवरून विनायक राऊतांची सरकारवर टीका

राज्यात आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली असून परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटीची घटना घटना घडली आहेल. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीच्या मराठी पेपरफुटीची घटना घडली आहे. यावरूनच आता महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, ”कॉपीमुक्त परीक्षा करू सांगणाऱ्या सरकारचा फज्जा उडाला. शिक्षणमंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

काय म्हणाले विनायक राऊत म्हणाले?

विनायक राऊत म्हणाले की, ”दर्जेदार शिक्षण मिळणारं महाराष्ट्र आता भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडला आहे. याआधी सर्व शाळा आणि एक गणेवश ही घोषणा केली, मात्र त्या घोषणेचा फज्जा उडाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही कॉपीमुक्त परीक्षा करू, हे महायुती सरकार छाती ठोकपणे सांगत होते. त्यांचा हा खोटारडेपणा समोर आला आहे. आज दहावीच्या पेपरफुटीनंतर त्यांचा फज्जा उडाला आहे. शिक्षणमंत्र्यांना माझी विनंती आहे की, या गंभीर प्रकरणाची जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणीव असेल तर, तुम्ही ताबडतोब तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि या भ्रष्टाचाराची जबाबदारी घ्या.”