
आपल्याकडे बहुतांशी घरांमध्ये चपाती किंवा पोळी करण्यासाठी कणिक मळली जाते. परंतु जास्त झालेली कणिक आपण सहजपणे फ्रीजमध्ये ठेवून देतो. परंतु अशा पद्धतीने कणकेची पोळी किंवा चपाती खाणं हे आरोग्यासाठी हितकारक नसते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेवर प्रक्रीया होऊन, आरोग्यावर अतिशय वाईट परीणाम होतात. फ्रिजमध्ये मळलेली कणिक ठेवल्यामुळे त्यावर बुरशी पटकन येऊ शकते. म्हणूनच फ्रीजमध्ये मळलेली कणिक ठेवताना दहा वेळा दुष्परीणामांचा विचार करा.
फ्रिजमध्ये कणिक ठेवण्याचे दुष्परीणाम
फ्रिजमधील कणिक अधिक काळ राहिल्यास या कणकेवर बुरशी येण्याचा संभव असतो. तसेच अशा कणकेची चपाती खाल्ल्यास उलटी जुलाबही होऊ शकतात.
कणिक तिंबलेली असते, त्यामुळे ती खराब होण्याची शक्यताही वाढते.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या खाल्ल्यास, पोटफुगीच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
कणिक फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातून तयार झालेली चपाती खाल्ल्यास आतड्यांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमधील पोषक द्रव्ये निघून जातात. त्यामुळे त्यापासुन चपाती करणे हे काहीच कामाचे नसते.
कणिक मळताना काय काळजी घ्याल?
नेहमी कणिक मळताना आपल्याला हवे तेवढेच पीठ घ्यावे. जेणेकरून उगाच मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवण्याची वेळ येत नाही.
एखाद्या वेळेस कणिक अधिक मळल्यास, ती कणिक चार ते पाच तासांपेक्षा अधिक काळ फ्रिजमध्ये ठेवू नये.
गव्हाचे पीठ हे कायम झाकून ठेवावे, नाहीतर पीठाला जाळी धरण्याची शक्यता अधिक असते.
फ्रिजमध्ये ठेवलेले कणिक काळे किंवा हिरव्या रंगाचे झाल्यास, हे कणिक अजिबात वापरू नये.