‘या’ फळाला सूपरफूड म्हणतात, याच्या सेवनाने दूर होईल कर्करोगाची शक्यता.. वाचा

संत्रे असे एक महत्त्वाचे फळ ज्यामध्ये खूप सारे गुणकारी तत्वं आहेत. हिवाळ्याच्या सुरुवातीपासून हे फळ बाजारात आपल्याला दिसू लागतं. उन्हाळ्यात संत्रे खाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरभरून मात्रेमध्ये असते. म्हणूनच संत्रे खाण्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते. संत्र्याच्या सेवनामुळे केवळ इतकेच नाही तर, खूप सारे फायदे आपल्याला मिळतात. संत्र्याच्या सेवनाने कोणकोणते फायदे आपल्याला मिळतील ते बघूया. 

संत्र्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे, शरीरावर येणारी सूज संत्र्याच्या सेवनामुळे दूर होते. संत्र्यामध्ये अॅंटीइफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे, सूज कमी होण्यास अधिक मदत होते.

 

विषाणूंना रोखून ठेवण्याची शक्ती संत्र्यामध्ये अधिक प्रमाणात असते. त्यामुळे आपण आजारांशी लढण्यास समर्थ होतो. 

 

संत्र्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स आणि प्रथिने असल्यामुळे, प्रतिकारशक्ती मजबूत राहते. 

संत्री नियमित सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते. 

 

संत्र्यामध्ये असणाऱ्या फ्लेवोनाॅयड आणि केरीटोनाॅयड या तत्वांमुळे कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पेशींना रोखण्यास मदत होते.

 

संत्र्यामध्ये बी-6 मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. तसेच त्या जोडीला उच्च रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते. 

मधुमेहींसाठी सुद्धा संत्रे हे खूप गुणकारी मानले जाते. संत्र्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे, मधुमेही संत्रे न घाबरता खाऊ शकतात. 

 

संत्र्यात मुबलक प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

 

रोज एक संत्रे खाल्ल्यामुळे हाडांच्या दुखण्यामुळे येणारी सूज तसेच संधीवात यासारख्या आजारांवर मात करता येते. 

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)