
रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि दिल्लीच्या कारभाराला सुरुवात केली. रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. त्या दिल्लीच्या नवव्या आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मात्र ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री अतिशी मर्लेना उपस्थित राहिल्या नाहीत.