ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा, राज्यभरातून 16 लाख 11 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी दहावीची (एसएससी) लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मुंबई, कोकण, नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा 17 मार्चपर्यंत चालेल.

  • प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते केंद्रांपर्यंत पोहोचवून वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण केले जाणार आहे. जीपीएसची, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्राच्या मदतीने गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात येतील. गैरमार्ग अवलंबणाऱया परीक्षा केंद्रांची (शाळांची) मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.