सिद्धांत वाडवलकरला जेतेपद

भायखळ्याच्या लव्हलेन येथे बीआयटी चाळीतील बाल मित्र कॅरम क्लबच्या वतीने आयोजित कॅरम स्पर्धेत सिद्धांत वाडवलकरने अमोल सावर्डेकरचा पराभव करून जेतेपद पटकावले. तर प्रान्सिस फर्नांडिस हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सामाजिक कार्यकर्ते शिरीष चिखलकर, आनंद साळवे, मोहन खंडे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.