
आयफोनचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ऍपल कंपनीने स्वस्त किमतीतील आयफोन 16 ई फोन अखेर लाँच केला. या फोनमध्ये आयफोन 16 मधील अनेक फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये 6.1 इंचांचा ओएलईडी स्क्रीन, रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि ए18 चिप दिले आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा दिलाय. फोनमध्ये सिलिकॉन टेक्नोलॉजीची बॅटरी दिली आहे. कंपनीने या फोनला तीन व्हेरियंटमध्ये लाँच केले. 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 59,999 रुपये, 256 जीबी स्टोरेजसाठी 69,999 रुपये, तर 512 जीबी स्टोरेजसाठी 89,999 रुपये किंमत ठेवली आहे. हा फोन सध्या काळा आणि पांढरा अशा दोन रंगांत उपलब्ध करण्यात आला आहे.