
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने कागदांच्या फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.
फसवणुकीच्या प्रकरणात कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. आता मंत्रिपदाचा राजीनामा तर घ्याच! मात्र राहुल गांधी यांना देशात आणि सुनील केदार यांना जो न्याय लावला आणि तातडीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले, आता हाच न्याय कोकाटे…
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 20, 2025
एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, फसवणुकीच्या प्रकरणात कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. आता मंत्रिपदाचा राजीनामा तर घ्याच! मात्र राहुल गांधी यांना देशात आणि सुनील केदार यांना जो न्याय लावला आणि तातडीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले, आता हाच न्याय कोकाटे यांना लावून हे सरकार न्यायप्रिय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून द्यायला हवे! असेही दानवे म्हणाले.