
अॅपलने आपल्या अॅपल टीव्ही अॅपला आता अँड्रॉईड स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि फोल्डेबल फोनसाठी लाँच केले आहे. यामुळे आता अँड्रॉईड युजर्स अॅपल टीव्हीचा कंटेट आपल्या डिव्हाईसवर पाहू शकतील. अॅपलने पाच वर्षांनंतर अँड्रॉईड युजर्ससाठी ही सुविधा दिली आहे. अँड्रॉईड युजर्सला अॅपल टीव्हीचा कंटेट पाहण्यासाठी वेब ब्राऊजर्स किंवा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मदत घ्यावी लागत होती.