
किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा रंगला. छत्रपती शिवाजी महाराजांना चिमुकल्या मावळ्यांनी चित्तथरारक कसरती करत मानाचा मुजरा केला. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवर शेकडो शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. यावेळी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत किल्ले शिवनेरीचा आसमंत दणाणून सोडला.
सर्व फोटो – चंद्रकांत पालकर