![Court](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/Court-Room-696x447.jpg)
नांदेडच्या गुरुव्दारा गेट क्र. 6 जवळ 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपीला मदत करणार्या एकास अटक करण्यात राज्याच्या एटीएस पथकाला यश मिळाले आहे. त्यास आज नांदेडात आणल्यानंतर न्यायालयाने त्यास 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरच्या आरोपीस पंजाबातून अटक करण्यात आली आहे.
नांदेड येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी शहिदपूरा भागात दोघावर गोळीबार करण्यात आला. त्यात रविंद्रसिंग राठोड याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गोळीबार करणार्यास ज्यांना मारायचे होते तो गुरमितसिंग सेवादार याने कुख्यात अतिरेकी हरविंदसिंग उर्फ रिंधा याचा भाऊ सत्येंद्रसिंग उर्फ सत्या याचा खून केला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर पॅरोलवर बाहेर आला होता.
10 फेब्रुवारी रोजी गोळीबार करणार्याने 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यात रविंद्रसिंघ राठोड या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर गुरमितसिंग सेवादार हा जखमी झाला होता. त्यानंतर मुख्य आरोपी फरार झाला होता. या प्रकरणात यापूर्वी चार दिवसांपूर्वी मनप्रितसिंघ ढिल्लो आणि हरप्रितसिंग बाबूसिंघ कारपेंटर यांना आरोपीस मदत करण्याच्या कारणावरुन अटक केली होती. या दोघांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले होते. हा तपास राज्याच्या एटीएस शाखेकडे वर्ग करण्यात आला.
एटीएस पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये पथक पाठविले. पंजाबमधून अर्शदीपसिंi भजनसिंग यास अटक केली आहे. त्याने यातील मुख्य आरोपीला मदत केली असल्याचा एटीएसचा दावा आहे. अर्शदीपसिंगला याला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले. त्याला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.