दापोलीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 49 रिक्त जागा; कार्यरत पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण

दापोलीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 49 जागा रिक्त आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. दापोली तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन मिळून एकूण 129 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मंजूर पदे आहेत. मात्र त्यापैकी 49 पदे अद्याप रिक्तच आहेत.

कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने त्यांच्यावर ताण वाढत आहे. पोलिसांची नियोजित तसेच प्राप्त परिस्थितीतील कामे पाहता मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

दापोली पोलीस स्टेशन अंतर्गत माहिती

  • एकूण गावे – 151
  • लोकसंख्या – दापोली शहर – 34956 , दापोली तालुका – 1,78,340
  • दूरक्षेत्र एकूण 5 – हर्णे, बुरोंडी, उन्हवरे, पालगड आणि आडे तर बीट संख्या 3
  • पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे मंजूर संख्याबळ – 1 पीआय, 2 पीएसआय, 65 अंमलदारांपैकी उपलब्ध संख्याबळ पीआय 1, एपीआय 2, पीएसआय 5, अंमलदार – 58 एकूण मंजूर अंमलदार 65 पैकी रिक्त 7

दाभोळ सागरी पोलीस ठाणेंतर्गत

  • एकूण गावे – 26
  • लोकसंख्या – 39,746
  • दाभोळ सागरी पोलीस ठाणेतर्गत पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांचे मंजूर संख्याबळ 61 . पीआय 2 पद त्यापैकी 1 रिक्त. अंमलदार मंजूर पदे 59 पैकी रिक्त जागा 40 आहेत.