Jalna Fire – जालन्यात कुलरचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

जालन्यात जुन्या एमआयडीसीमधील कुलरचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीचे प्रयत्न करून अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीमधील कुलरचे साहित्य आणि तीन टन हनीपॅड जळून मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याबाबत तपास सुरु आहे.