
महाकुंभातील सेक्टर क्रमांक 8 मधील अनेक तंबू आज जळून खाक झाले. पाचव्यांदा ही आगीची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. क्षी कपी मानस मंडळ आणि ग्राहक संरक्षण समितीच्या छावणीत आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे सगळीकडे भाविकांची एकच धावपळ उडाली. सर्वांना तत्काळ तंबूबाहेर काढल्याने जीवितहानी टळली.
याआधी 19 जानेवारीला सेक्टर 19 मधील गीता प्रेसमध्ये आग लागली होती. आगीत तब्बल 180 तंबू जळून खाक झाले. त्यानंतर 30 जानेवारीला सेक्टर 22 मध्ये लागलेल्या आगीत 15 तंबू जळाले. 7 फेब्रुवारीला सेक्टर 18 मध्ये लागलेल्या आगीत 22 मंडप जळाले. 15 फेब्रुवारी रोजी सेक्टर 18 आणि 19 मध्ये आग लागली, तर 17 फेबुवारीला सेक्टर 8 मध्ये आग लागली. दरम्यान, 13 जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 53.988 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले.