
राज्याचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या 10 मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन, तर विभागावर मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवस देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. या पुरवणी मागण्यांवर दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.