कतारचे आमीर हिंदुस्थानात; मोदींनी केले स्वागत

कतारचे आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हिंदुस्थानच्या दोन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले,  गळाभेट घेतली.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अल थानी यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी आमीर यांचे राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाईल. यानंतर ते हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली जाईल. विविध प्रकारच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. दरम्यान, यापूर्वी अल थानी यानी 2015 मध्ये हिंदुस्थानचा दौरा केला होता.