Torres Scam Case – त्या जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी देण्याची मागणी

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 35 कोटी रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे. त्यापैकी पाच कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केली आहे. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी विविध स्वरूपात जवळपास 35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यापैकी फर्निचर, सात ते आठ गाडय़ा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा मिळून पाच कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी देण्यात यावी अशी लेखी मागणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केली आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल आणि त्यातून मिळणारी रक्कम नियमाप्रमाणे गुंतवणूकदारांना देण्यात येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.