पोर्शे कंपनी 1900 कर्मचाऱ्यांना कामावरून डच्चू देणार

स्पोर्टस् कार बनवणारी कंपनी पोर्शेने कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. कंपनी 1900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. जर्मनीतील स्टटगार्ट, मुख्यालय आणि एका रिसर्च सेंटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे. जगभरात पोर्शे कंपनीच्या कार विक्रीत 3 टक्के घसरण झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 911 स्पोर्टस् कार मॉडल बनवणाऱ्या पोर्शे कंपनीत जगभरात जवळपास 42 हजार लोक काम करतात.