यूएईमध्ये हिंदुस्थानींना व्हिसा ऑन अरायव्हल

युनायटेड अरब अमिरातकडून हिंदुस्थानी नागरिकांना मिळणाऱ्या व्हिसा ऑन अरायव्हल प्रोग्राममध्ये बदल करण्यात आले आहेत. हिंदुस्थानी नागरिकांसाठी सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हिंदुस्थानाच्या आधी युरोपियन युनियन मेंबर स्टेटस, अमेरिका आणि युनायडेट किंग्डममधील व्हिसाधारकांना ही सुविधा देण्यात येत होती. व्हिसा ऑन अरायव्हल प्रोग्रामचा हिंदुस्थानींना फायदा होणार आहे.