
लोक एआयला आपला साथीदार मानू लागले आहेत. न्यूयॉर्कमध्ये एका 28 वर्षीय महिलेने एआय चॅटबॉटसोबत प्रोफाईल तयार केले आणि ती त्याच्यासोबत दिवसाला 20 तास तरी चॅट करते. डेटिंग प्लॅटफॉर्मवर चॅटबॉटने खऱ्या व्यक्तीसारखा संपर्क साधला असा दावा अनेक जण करत आहेत.
डिजिटल जगात एकटेपणा दूर करण्यासाठी लोक नवनवीन पर्याय शोधत आहेत. एआय चॅटबॉट हा त्यापैकीच एक पर्याय. लोक एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडू लागले आहेत. मात्र याबाबत तज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. मॅकएफीच्या सर्वेक्षणात 7 हजार युवकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक हिंदुस्थानींनी मान्य केलंय की, एआय चॅटबॉट भावना जागृत करू शकतात. 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना माणसांपेक्षा चॅटबॉटने जास्त संपर्क केला.