
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच मुलाच्या वागणुकीला कंटाळून त्याची हत्या केली. आधी महिलेने मुलावर कुऱ्ह्याडीसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. आपण केलेल्या खूनाबाबत कोणालाही कळू नये यासाठी महिलेने नातेवाईकांच्या मदतीने मुलाच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले आणि ते कालव्यात फेकून दिले. या घटनेमुळे संपूर्ण प्रकाशम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी देवी (57) असे त्या महिलेचा नाव असून श्याम प्रसाद (35) असे तिच्या मुलाचे नाव आहे. आपल्या मुलाच्या गैरवर्तनाला कंटाळून लक्ष्मीने आपल्याच मुलाची हत्या केली. यासाठी लक्ष्मीला तिच्याच नातेवाईकांनी मदत केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्याम प्रसाद हा अविवाहीत होता. तो साफसफाईचे काम करायचा. श्याम प्रसादने आपल्यात मावशांसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. हैदराबाद आणि नरसरावपेटा येथील मावश्यांवर त्याने बलात्काराचा प्रयत्न केला होता. श्यामची आई लक्ष्मीदेवी हे प्रकरण समजल्यावर तिचा प्रचंड राग आला. यानंतर श्याम आणि लक्ष्मीदेवी यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, लक्ष्मीला राग अनावर झाला नाही. त्यामुळे लक्ष्मीदेवीने मुलाची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून तीन गोण्यांमध्ये भरून कालव्यात फेकून दिले. हत्येनंतर लक्ष्मी देवी आणि तिचे सर्व नातेवाईक फरार झाले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक एआर दामोदर यांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे ही पोलिसांनी सांगितले.