राम मंदिरात 15 कोटींचे महादान

 

महापुंभ सुरू झाल्यापासून महिनाभरात 15 कोटींहून अधिक दान राम मंदिरात जमा झाले आहे. यात रामलल्लासमोर ठेवलेल्या 6 दानपेटीतील रोख रक्कमेचाही समावेश आहे. भाविकांची प्रचंड गर्दी होत असून रोज दानपैटीत पैसे टाकता येत नाहीत. त्यामुळे त्यांना ते बाहेरच्या दानपेटीतच ठेवावे लागत आहेत. गर्दीच्या दबावामुळे लोकांना येथे थांबू दिले जात नाही. महापुंभाच्या आधीही मंदिरात दर महिन्याला 3 कोटी रुपये देणग्यांच्या स्वरुपात जमा होत होते. 14 जानेवारीपासून अयोध्येत येणाऱया भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ सुरू झाली.