
आठ वर्षांपुर्वी आयर्लंडची रहिवाशी असलेली डॅनिएल मॅकलॉक्लिन ब्रिटिश पासपोर्टवर 2017 मध्ये हिंदुस्थानात आली होती. येथे आल्यानंतर ती प्रचंड खूश होती. गोव्यात पोहोचल्यानंतर तीची मैत्री एका व्यक्तीशी झाली. त्याने तीचे हसणे, भरभरून जगणे सर्वकाही हिरावून घेतले. तिच्यावर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. आता तब्बल 8 वर्षांनंतर याप्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे. 25 वर्षांच्या डॅनिएलकडे ब्रिटन आणि आयर्लंड या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
हिस्ट्री शिटर विकट भगत आरोपी
डॅनिएलचा मृत्यू गळा दाबल्याने आणि ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले. तपासाच हीस्ट्री शिटर विकट भगत याने डॅनिएलवर बलात्करा करून तिची हत्या केल्याचे समोर आले. भगत तिच्यासोबत अनेक ठिकाणी फिरताना दिसला होता. दोघे सीसीटीव्ही पॅमेऱयातही पैद झाले होते. पोलिसांनी भगतच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे, रक्ताचे डाग पडलेली स्पुटी सापडली. भगतला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.