
पतीकडून होणाऱया शारीरिक आणि मानसिक छळाला पंटाळून पत्नी कर्ज वसुलीसाठी घरी येणाऱया एजंटचा हात धरून पळून गेल्याची घटना बिहारमधील जमुई जिह्यात घडली. महिलेचे नाव इंद्रा असे असून तिचे नपुल याच्याशी 2023 मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पती सतत मद्यपान करून तिला मारहाण करायचा. यादरम्यान तिची भेट पवन कुमार यादव या कर्ज वसूल करणाऱया एजंटशी झाली.
पवन कुमार यादव कर्ज वसुलीसाठी घरी यायचा. कालांतराने, महिलेची एजंटशी मैत्री झाली आणि शेवटी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ही महिला आणि कर्ज वसुली एजंटने तब्बल पाच महिने त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. 4 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या आसनसोलला ते पळून गेले. त्यानंतर जमुईला परतण्यापूर्वी ते काही दिवस इंद्राच्या मावशीच्या घरी राहिले होते. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी त्यांनी एका मंदिरात लग्न केले. लग्नाला अनेकजण उपस्थित होते. लग्न पार पडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पतीला आपली पत्नी एजंटसोबत पळून गेल्याची खबर कळाली. दरम्यान, इंद्राने स्वतःच्या इच्छेने पवनशी लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पवन पुमारने त्याला आणि इंद्राला तिच्या पुटुंबीयांकडून धोका असल्याचे म्हणत पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे.
दारूड्या पतींना सोडून महिलांचे एकमेकांशी लग्न
दोन महिलांनी त्यांच्या दारूडय़ा पतींना सोडून एकमेकांशी लग्न केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली. गुंजा आणि कविता अशी त्यांची नावे असून त्यांनी देवरिया येथील शिव मंदिरात लग्न केले. आमच्या पतींच्या सतत दारू पिण्यामुळे आणि आम्हाला मारहाण करण्यामुळे आम्ही प्रचंड कंटाळलो होतो. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे या महिलांनी सांगितले.