
पुणे, मुंबईनंतर आता नागपुरातही जीबीएसचा उद्रेक झाला आहे. येथे जीबीएसमुळे एकाचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, पारडी परिसरातील एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, जो या वर्षी नागपूरमधील जीबीएसमुळे झालेला पहिला मृत्यू आहे. दोन्ही हात, पाय आणि चेहरा अर्धांगवायू झाल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्याचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती देताना जीएमसीएच येथील औषध विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी सांगितले की, रुग्णाला न्यूमोनिया देखील झाला होता, ज्यामुळे श्वसनाचा त्रास होत होता. त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाची जीबीएस चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि 11 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जीबीएसच संसर्ग इतर दोन पुरुष रुग्ण सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.