सूर-ताल- संगीत संयोजनाचे महत्त्व

>> गणेश आचवल

हार्मोनियम वादक, कीबोर्ड वादक, वाद्यवृंद संचालक, अनेक सांगितिक कार्पामांचा संगीत संयोजक, निवेदक अशा अनेक जबाबदाऱया सहजपणे पेलणारा कलाकार म्हणजे आनंद सहस्त्रबुद्धे!!

संगीत क्षेत्रात पंचवीस वर्षांपेक्षा अधिक वर्षे आनंद सहस्त्रबुद्धे  विविध भूमिकांत कार्यरत आहे. आनंदचे शालेय शिक्षण हंसराज मोरारजी शाळेत झाले. वयाच्या तिसऱया वर्षांपासून त्याला पेटी वादनाची आवड होती. शालेय कार्पामात तो पेटी वादन करायचा, तसेच अनेक नाटकातून अभिनय करायचा. त्याने शाळेत असतानाच ‘तौबा मेरी तौबा’ नावाच्या हिंदी मालिकेत भूमिका केली होती. नंतर त्याने पार्ले येथील डहाणूकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1998 पासून विविध गाण्यांच्या स्पर्धा, कॉलेजमधील कार्पाम यासाठी तो पेटी वादन करत होता.

आनंदच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आला तो 2000 साली, मुंबई विद्यापीठात संगीतकार अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजन आणि संगीत दिग्दर्शन या विषयाच्या अभ्यापामासाठी आनंदने प्रवेश घेतला होता तेव्हा! अनिल मोहिले सरांचे मार्गदर्शन त्याच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देणारे ठरले. संगीत संयोजन म्हणजे नेमके काय , वाद्यवृंदाचे संचालन कसे करायचे, नोटेशन्स लिहिणे ही गोष्ट वादकासाठी किती महत्त्वाची आहेत अशा अनेक गोष्टी आनंदला त्या अभ्यापामात शिकता आल्या. विविध गाण्यांचा म्युझिक स्कोअर कसा लिहायचा हेदेखील तो तिथे शिकला. वाद्याचा वापर न करता नोटेशन्स लिहिता आली पाहिजेत, हा मोहिले सरांचा आग्रह असायचा. दहा-दहा तास आनंद अनेक गाण्यांचे नोटेशन्स लिहायचा. एकदा त्याने ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या गाण्याचा म्युझिक स्कोअर उत्तम प्रकारे लिहिला आणि त्यामुळे अनिल मोहिले सरांनी त्याला बक्षीस म्हणून  चार्ट पेपर्स आणि स्केच पेन्स दिले होते. नोटेशन्स लिहिण्यासाठी  मिळालेले हे बक्षीस त्याला खूप महत्त्वाचे वाटते.

2003 मध्ये लतादीदींच्या एका सांगितिक कार्पामाचे संगीत सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. विविध म्युझिक अल्बम्ससाठी त्याने  कीबोर्ड वादन, संगीत संयोजन, संगीत सहाय्यक म्हणून काम केले  आहे. संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या काही कार्पामांसाठीसुद्धा त्याने संगीत सहाय्यक आणि संगीत संयोजन केले होते.

सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्पामात आनंद हा वादक म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहे. एखादे गाणे सादर होताना वादकांनी नोटेशन्स लिहिणे हे खूप महत्त्वाचे आहे, हे मोहिले सरांचे मार्गदर्शन आनंदने आजपर्यंत कायम लक्षात ठेवले आहे. वादकांना नोटेशन्स लिहिणे सोपे जावे, या उद्दिष्टाने आनंदने स्वतचा ‘नोटेशन – नो टेंशन’ नावाचा एक अभ्यापामदेखील सुरु केला. कोरोना काळात त्याने हा अभ्यापाम ऑनलाईनदेखील घेतला होता. संगीत संयोजन करताना गीतकाराने गाण्यात नेमके काय मांडले आहे, ते शब्दसुद्धा लक्षात घेणे आवश्यक असते. एखाद्या चित्रामध्ये  आपण जो कॅनव्हासचा बॅकड्रॉप वापरतो, ते म्हणजे संगीत संयोजन आणि संगीत संयोजन ही गाण्याची अंतर्गत सजावट असते, असे तो म्हणतो.

आनंदला 2003 मध्ये  प्रथमच सुरू झालेला ‘संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार’ उदयोन्मुख वाद्यवृंद रचनाकार म्हणून मिळाला. तसेच 2021 मध्ये संगीत संयोजन या क्षेत्राची पहिल्यांदा दखल घेऊन आनंदला इंद्रधनु संस्थेतर्फे ‘सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार’ही मिळाला आहे. मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचे संगीत संयोजनसुद्धा एकदा त्याने केले होते. आनंद अनेक वाद्यवृंदात निवेदन आणि संगीत संयोजन अशा दुहेरी भूमिका सहज करतो. संगीत संयोजनाच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शनदेखील करत आहे. त्यासाठी आनंदने काही अभ्यापाम सुरु केले आहेत. ‘संगीत संयोजन – गाण्याचे इंटिरिअर डेकोरेशन’ असा एक कार्पामदेखील तो सादर करतो. आनंद या क्षेत्रात  गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा वारसा हा अतिशय उत्तम प्रकारे पुढे नेत आहे.

atharvabharadwaj@gmailcom 

(लेखक शिक्षक, मुक्तपत्रकार व आरजे आहेत)