तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

देखभाल व दुरुस्ती कामासाठी लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 पर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.