आयला, ऑस्ट्रेलियाला लंकेने हरवले

कर्णधारासह अन्य दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-0 ने लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे कसोटीत झालेल्या पराभवाचा वचपा लंकेने एकदिवसीय मालिकेत काढला असून ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देत अक्षरशः लोळवले आहे. दुसऱया एकदिवसीय सामन्यात लंकेने ऑस्ट्रेलियावर तब्बल 174 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातली. तब्बल 43 वर्षांनंतर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची किमया करून दाखवली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 गडी गमावून 281 धावा केल्या. पुसल मेंडिसच्या 101, असलंकाच्या 78 आणि मधुशंकाने केलेल्या 51 धावांच्या धावांच्या जोरावर लंकेने 281 धावांचा टप्पा गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 107 धावांवरच खुर्दा उडाला.