लग्न केल्यानंतर द्यावा लागेल टॅक्स; ब्राझीलमधील मॉडेलची अजब मागणी

ब्राझीलमधील मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर कॅरोल  रोसलिन ही सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे. नेहमी चर्चेत राहण्यासाठी ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत असते. आता तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असून होणाऱ्या नवऱ्यासमोर एक वेगळीच अट ठेवली आहे. माझ्याशी लग्न करणाऱ्या तरुणाला मला दर महिन्याला टॅक्स द्यावा लागेल, अशी अजब मागणी तिने केली आहे. तिच्या या अजब मागणीमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

कॅरोल  रोसलिनला लग्न करायचे आहे, परंतु तिला टॅक्स भरणारा नवरा हवा आहे. म्हणजेच होणाऱ्या नवऱ्याकडून तिला एक ठरावीक रक्कम हवी आहे. कॅरोल ला जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्याची सवय आहे. ती आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. यासाठी तिने खास ट्रेनरसुद्धा नेमला आहे. यासाठी ती दर महिन्याला 3 लाख रुपये खर्च करते. ती साओ पाउलो येथे राहायला असून तिला जास्त पैसे खर्च करणारा नवरा हवा आहे. त्यासाठीच तिने ही अट ठेवली आहे. कॅरोल  रोसलिन ही आपल्या फिटनेसवर खूप ध्यान देते. शरीर फिट ठेवण्यासाठी अपार कष्ट करावे लागताच, परंतु यासोबतच प्रचंड पैसासुद्धा खर्च करावा लागतो, असे कॅरोल  म्हणते.