![operation](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/operation-696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एक अजब घटना उघडकीस आली आहे. राकेश कुमार यांची पत्नी शांतीदेवी ही अचानक घरातून बेपत्ता झाली होती. राकेश हा वेल्डिंगचे काम करतो. डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने तो तपासणीसाठी रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी त्याला मोतीबिंदू झाल्याचे सांगत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. 7 फेब्रुवारीला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली. राकेशच्या शेजारच्या खाटेवरील महिलेने पाणी मागितले, परंतु हा आवाज ऐकून राकेशला धक्का बसला. कारण आवाज ओळखीचा वाटत होता. राकेशने डोळे उघडून पाहिल्यानंतर समोर असलेली महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची हरवलेली बायको होती. हे पाहून राकेशच्या डोळ्यांत पाणी आले. अश्रू अनावर झाले.