![google](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/google-696x447.jpg)
प्रसिद्ध टेक कंपनी गुगल इंडियाने मुंबईतील बीकेसी येथील आपल्या ऑफिसचे पुन्हा एकदा नूतनीकरण केले आहे. स्क्वायर यार्डच्या माहितीनुसार, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल क्लाऊड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये जवळपास 1.11 लाख वर्ग फूट कार्यालय प्रति महिना 3.55 कोटी रुपये भाडय़ावर घेतले आहे, तर गुगल क्लाऊड इंडियाच्या ऑफिससाठी महिन्याला भाडे 1.24 कोटी रुपये इतके आहे. गुगलने दोन्ही ऑफिस पाच वर्षांच्या करारनाम्यावर घेतली असून यासाठी 304 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. गुगलची दोन्ही ऑफिस वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील फर्स्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर येथे कार्यरत आहेत.