![accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/shahapur-st-bus-accident-news-696x447.jpg)
वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत असताना अनियंत्रित कार उलटल्याने अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू झाला. एक कारचालक गंभीर जखमी आहे. नागपूर-तुळजापूर मार्गावरील सेलूच्या बोर नदीच्या पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री 1.10 वाजता हा अपघात घडला. समीर चुटे, शुभम मेश्राम आणि सुशील मस्के अशी मयतांती नावे आहेत. धनराज धाबर्डे असे जखमीचे नाव आहे.
जखमीवर नागपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वजण वर्ध्यातील सिंदी येथील रहिवासी आहेत. धनराज धाबर्डे याचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करायला नागपूरला गेले होते. तेथून परतत असताना सेलूजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. यात शुभम आणि सुशीलचा जागीच मृत्यू झाला. तर समीरचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.