![vishal dadlani](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/vishal-dadlani-696x447.jpg)
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी याचा नुकताच अपघात झाला आहे. या अपघातामुळे त्याची पुण्यात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. विशालने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. आपला अपघात झाला असून उपचार सुरू आहेत, असे त्याने म्हटले आहे. कॉन्सर्टबाबत पुढच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
विशाल ददलानी याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी कॉन्सर्टच्या तारखेत बदल करण्यात आला असून त्याचे कारणही सांगितले. विशालने कॉन्सर्टच्या पोस्टरसह त्याच्या स्टोरीत लिहिले आहे की, “माझा एक छोटासा अपघात झाला. मी लवकरच परत येईन. मी तुम्हाला सर्वांना अपडेट देत राहीन. मात्र या अपघाताबद्दल किंवा तो कसा घडला याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. त्याच्यासोबत, आयोजकांनीही त्यांच्या सोशल मीडियावर याबद्दल शेअर केले.
View this post on Instagram
पुण्यात विशाल ददलानीसोबत शेखर देखील सादरीकरण करणार होता. ही कॉन्सर्ट 2 मार्चला होणार होता. मात्र या कॉन्सर्टची तारीख बदलण्यात आली असून ती कधी होणार याबाबत तारीख कळवलेली नाही. हा इव्हेंट अर्बन शोजने आयोजित केला होता. त्यांनीही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला सांगताना फार खेद वाटतोय की, विशाल आणि शेखर यांचा 2 मार्च रोजी होणारा अर्बन शोज म्युझिक कन्सर्टची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. विशालचा अपघात झाल्याने याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
एवढेच नाही तर त्यांनी तिकिटांबाबतही लोकांना माहिती दिली. तिकीट भागीदाराकडून ज्यांनी खरेदी केली असतील त्यांना संपूर्ण रक्कम परत केली जाईल आणि लवकरच ही कॉन्सर्ट कधी होणार याची तारीख कळविण्यात येईल.