उन्हाळ्यात करुन बघा ‘ही’ चटकदार चटणी, तुमची भूकही वाढेल आणि तोंडाला चवही येईल!

उन्हाळा आल्यावर आपल्या आहारामध्ये बदल करणे हे खूपच गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो हलका आहार घेण्यासाठी कायम सांगितला जातो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हंगामी पदार्थांपासून हिरव्या चटण्या करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळेच तुम्हीही आहारात काही हंगामी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चटण्या करु शकता.

उन्हाळ्यात कोथिंबीर, कडीपत्ता, कैरी, पुदीना, आवळा, कवठ, चिंच, कच्ची करवंदे यासारख्या हंगामी गोष्टींपासून चटण्या करणे हे उत्तम असते. कोथिंबीरीचा वापर हा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केल्यास, आपली भूक न लागण्याची समस्या खूप अंशी दूर होते. उन्हाळ्यात बाजारामध्ये कच्ची करवंदे विकायला येतात. या कच्च्या करवंदाची चटणी अनेक घरांमध्ये केली जाते. कच्चा करवंदाची चटणी ही फक्त जिभेसाठी उत्तम नाही तर, याचे आरोग्यवर्धकही अनेक फायदे आहेत.
कच्च्या करवंदाची चटणी कशी करावी?
साहित्य
कच्ची करवंद- एक वाटी
मीठ- चवीनुसार
कोथिंबीर- 
पुदीना- 
लसूण- 5 ते 6 पाकळ्या
ओले खोबरे- अर्धी वाटी
कृती- कच्ची करवंद बाजारातून आणल्यावर नीट स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर खूप जून करवंद असतील तर आतील बी काढून टाकावे. मिक्सरमध्ये खोबरे, कोथिंबीर, पुदीना, लसूण, मीठ सर्व एकत्र करुन घ्यावे. 
ही चटणी उन्हाळ्यात करण्याची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. 
कच्च्या करवंदाची चटणी खाण्याचे फायदे
मुख्य म्हणजे करवंद हे जंगलात वाढणारे झाड आहे. त्यामुळे या झाडावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया ही केली जात नाही. 
 
करवंदाची चटणी हिमोग्लोबीन वाढीसाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. 
 
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करवंदाची चटणी महत्त्वाची भूमिका बजावते. 
 
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ही चटणी खाण्याकडे अनेकांचा कल असतो. 
 
डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा करवंदाची चटणी खाणे हितकारक आहे.