![rbi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/10/RBI-696x447.jpg)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये 31 मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. 31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या 2024-25 या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी आदी शहरांत 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नसेल.
1 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी
1 एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.