बांगलादेशात हिंदुवर अत्याचार, United Nation च्या अहवालामुळे मोहम्मद युनूस तोंडघशी

बांगलादेशात सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. पण त्याचवेळी अल्पसंख्यांक हिंदूवरही हल्ले झाले होते. तेव्हा बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी असे हल्ले झाले नसल्याचे म्हटले होते. तसेच हा प्रोपगंडा असल्याचा दावाही केला होता. पण आता संयुक्त राष्ट्रसंघाने आपली अहवालात असे हल्ले झाल्याचे म्हटले आहे. युनूस खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्यशोधन समितीला आमंत्रण दिले होते. सरकारविरोधात आंदोलनावेळी आणि आंदोलनानंतरही हिंदू जनता, हिंदू मंदिरावर हिंसक हल्ले झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसीना यांच्याविरोधात देशात मोठे आंदोलन झाले, आणि त्यामुळे हसीना यांना हिंदुस्थानात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांगलादेशात हिंदूंसोबतच अहमदिया मुस्लीम आणि आदिवासींवरही हिंसक हल्ले झाले होते.

या आंदोलनावेळी आणि आंदोलनानंतरही हिंदू, अहिमदिया मुस्लीम आणि चित्तगॉंग भागातील आदिवासींच्या घरावर हल्ले झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे. फक्त घरंच नाही तर हिंदूंच्या मंदिरांनाही लक्ष्य केल्याचे अहवालात नमूद केले आहे.

हिंदुस्थानात येण्यासाठी सीमेवर बांगलादेशी हिंदूंची गर्दी

शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात हिंदूंवरही हल्ले झाले होते. आंदोलकांनी हिंदूंची घरं, मंदिर आणि त्यांच्या दुनकांवरही हल्ले केले होते. त्यामुळे अनेक हिंदू हे हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या सीमेवर आले होते आणि त्यांनी हिंदुस्थानात आश्रय मागितली होता. पण बीएसफच्या जवानांनी त्यांना माघारी पाठवले.