रशियात बिअर कॅनवर महात्मा गांधींचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

रशियामधल्या एका बिअर कंपनीने त्यांच्या बिअर कॅनवर हिंदुस्थानचे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो प्रिंट केला आहे. या बिअर कॅनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जगभरातील हिंदुस्थानी नेटकरी त्यावर संतापले आहेत. या बिअर कंपनीला हिंदुस्थानींकडून मोठा विरोध केला जात आहे. त्या बिअर कॅनवर Mahatma G. असं लिहिलेलं आहे.